देवरी : गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अभय डोंगरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कैम्प देवरी, विवेक पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे प्रविण डांगे पोलीस निरिक्षक देवरी यांचे आदेशान्वये पोलीस ठाणे देवरी हद्दीतील हरविलेले मोबाईलचे CEIR प्रणालीचा वापर करुन विवीध कंपनीचे मोबाईलचा शोध देवरी पोलीसाद्वारे घेण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन देवरी पोलीसांनी शोध घेतलेले १४ मोबाईल आमदार संजय पुराम यांचे हस्ते मोबाईल अर्जदारांना (मालकांना) परत करण्यात आले. अर्जदारांनी मोबाईल शोधुन मिळाल्याने गोंदिया पोलीस दल व देवरी पोलीसांचे आभार मानले आहे. सदर मोबाईल शोध पो.शि. गोपालप्रसाद पांडे, ब.न. १४५०, गुणेश्वर नेवारे/२२१५ यांनी केली.








