स्वातंत्र्य दिनानिमित्त हेल्पिंग ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

देवरी – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हेल्पिंग ग्रुप, देवरी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा आणि रक्तसाठ्यात वाढ व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय देवरी परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ध्वजारोहणानंतर ४ वाजता पर्यंत करण्यात आले आहे.

शिबिरात देवरी व परिसरातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. आता पर्यंत अनेकांनी रक्तदान करत समाजसेवेचा संकल्प केला. रक्तदान हे जीवनदान असल्याचे सांगत हेल्पिंग ग्रुपचे पदाधिकारी यांनी सर्वांना दरवर्षी रक्तदान करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात स्थानिक राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते , अधिकारी, आरोग्य अधिकारी, समाजसेवक तसेच शाळा-कॉलेजचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून शिबिरात गोळा झालेले रक्त स्थानिक रक्तपेढीमार्फत गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष दिवशी समाजहितार्थ राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे “देशभक्ती आणि मानवता” यांचा सुंदर संगम घडून येणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या चळवळीचा भाग बनून रक्तदान करण्याचे आवाहन हेल्पिंग ग्रुप द्वारे करण्यात आले आहे.

दि. १५ ऑगस्ट २०२५ । वेळ : सकाळी ८.३० ते दु. ४.०० पर्यत

Sachin Bhandarkar ???????? 9420619248
Jay Sakhare. ???????? 9405343567
Eliyaz qureshi ???????? 8788387748
Pinku Karande ???????? 8766435508
Sanju Salame ???????? 7767051208
Nikhil sende ???????? 8999366752
Dipak Suryawanshi ???????? 7264942230

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें