वर्गखोली बांधकामाचे विद्यार्थ्यांच्या हस्ते भूमीपूजन, तालुक्यातील पहिला प्रयोग

देवरी : जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत अनेक दिवसापासून आदर्श आमगाव या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला विद्यार्थ्यांना बसण्याकरिता खूप अडचणींचा सामनावा करावा लागत होता. जिल्हा परिषद सदस्य कल्पना वालोदे यांनी तळमळीने सदर विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था व्हावी ह्या हेतूने वर्ग खोली मंजूर करून दिली त्या वर्ग खोलीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी व शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच व शाळेचे मुख्याध्यापक वर्गशिक्षक यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाच्या कार्यक्रम संपन्न झाला. विशेष म्हणजे सदर बांधकामाचे भूमिपूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले असून या उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे. या प्रसंगी आमगाव आदर्श चे सरपंच रवींद्र वालदे शाळेचे मुख्याध्यापक राऊ , नितेश वालोदे, योगेश ब्राह्मणकर गावकरी , विद्यार्थी उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें