■ देवरी शहरातील विजय अग्रवाल यांच्या मुलीची उंच भरारी.
देवरी,ता.१४: गोंदिया जिल्हांतर्गत देवरी शहरातील. सुहानी विजय अग्रवाल ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ती तालुक्यातील पहिली महिला पायलट ठरली आहे. सुहानीने अमेरिका येथून पायलटचं शिक्षण घेत ट्रेनिंग घेतलं होते.
वडिल विजय अग्रवाल यांच्याच्या सांगण्यानुसार, तिचे लहानपणापासून विमान उडविण्याचे स्वप्न होते आणि आता हे स्वप्न पूर्ण झाले आहे. वडील यांनी नेहमीच तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तिला प्रेरित केले आहे. मागील दीड वर्षापासून सुहानीने वैमानिकाचे अमेरिकेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये पायलटचे ट्रेनिंग घेतले. आता ती लायसन्स प्राप्त पायलट आहे.
सुहानीला मिळालेल्या या यशामुळे अग्रवाल कुटुंबातील वडील विजय अग्रवाल आई खुशबू ,काका दीपक व राकेश आणि भाऊ करण तसेच आजोबा
विष्णुप्रसाद आणि आजी सुशीला यांच्यासह संपूर्ण देवरी तालुक्यात आनंदाची लाट उसळली आहे. तिच्या पालकांनी सांगितले की, वडिल विजय अग्रवाल यांचे लहानपणीच पायलट होण्याचे स्वप्न होते पण त्यावेळी ते प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत आणि आज त्यांची मुलगी सुहानीने त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांना त्यांच्या मुलीचा खूप अभिमान आहे. तिच्या यशामुळे इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल. महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात हे तिने सिद्ध केले आहे. तिने असे फील्ड निवडले आहे जिथे सामान्यतः पुरुष जातात. मात्र सुहानीच्या यशामुळे इतर महिलाही प्रेरणा घेऊन, त्यांनीही स्वप्ने पूर्ण करावीत असेही त्यांच्या कुटूंबीयांचे म्हणणे आहे.








