ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी

देवरी : स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. यामध्ये केजी पासून १० व्या वर्गाचे विद्यार्थी सहभागी झालेले होते.

ब्लॉसम स्कुलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धांचे आयोजन केले होते. संस्कृतीनुसार गुरु च्या वेशभूषेत चिमुकले विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी हातानी तयार केलेले भेट कार्ड्स शिक्षकांना समर्पित केले आणि गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य , शिक्षक आणि शिक्षिका मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मेघा तावादडे आणि आभार आस्था अग्रवाल हिने मानले.  सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सरिता थोटे, वैशाली मोहुर्ले, केजी च्या शिक्षिका मनीषा काशीवार, प्रियांका सलामे, प्राथमिकचे तनुजा भेलावे , संगीता काळे , राहुल मोहुर्ले , विश्वप्रित निकोडे , नितेश लाडे, आकांक्षा डिबे आणि इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें