खेमेंद्र कटरे यांना ग.त्र्य.माडखोलकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर

गोंदिया: शासनातर्फे सन २०१९, २०२०, २०२१, २०२२ व २०२३ या ५ वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर केले आहे. तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे २०२१, २०२२ व २०२३ वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन २०२२ वर्षाकरीता नागपूर विभागाचा ग. त्र्य. माडखोलकर पुरस्कार हा गोंदियाचे वरिष्ठ पत्रकार खेमेंद्र कटरे यांना जाहीर झालेला आहे.

खेमेंद्र कटरे यांना यापूर्वी २००७,२०१७ मध्ये सुध्दा हा पुरस्कार मिळालेला आहे. ते जिल्ह्यात तिसर्‍यांदा हा पुरस्कार मिळवणारे ठरले आहे. ते महाराष्ट्र टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी असून साप्ताहिक बेरार टाईम्सचे संपादक आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें