भर्रेगाव शाळेत नवागताचे स्वागत व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

देवरी: जि. प. वरिष्ठ प्राथ. शाळा भर्रेगाव येथे शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. बॅण्ड व लेझीम च्या तालात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वाजतगाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाला विशेष अतिथी संदीप भाटीया जि. . सदस्य गोंदिया, प्रल्हादजी सलामे पं. . सदस्य देवरी, अध्यक्ष लखनलाल पंधरे सरपंच भर्रेगाव, प्रमुख अतिथी जयेंद्रमेंढे उपसरपंच, विनोद काटेंगे अध्यक्ष शा. व्य. समिती, संध्याताई बहेकार पोलीस पाटील,. संतोषजी खोटेले अध्यक्ष तं. मु. .,मा. सी. आर. चाचेरे ग्रा. वि. अधि. योगराजजी साखरे. मुन्नीताई उसेंडी, रिताताई सलामे सदस्य ग्रा. पं. भर्रेगाव,. ज्योती डाबरे से. नि. मुख्याध्यापिका,. गायत्रीताई नागमोते उपाध्यक्ष शा. व्य. ., मा. बिसराम सलामे माजी अध्यक्ष,. केशोरावजी कोरेटी उपाध्यक्ष शि. पा. संघ,. सीमाताई खोटेले अध्यक्ष मा. पा. समिती,. मदन रहिले,. बाबुराव रहिले,. सुरेंद्रजी खोटेले,. सावजी दर्रो,. मनोजजी शेंडे माजी पाटील भर्रेगाव ग्रामस्थ पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते शाळेत प्रवेश घेतलेल्या बालकांचे त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत गणवेश, जोडे पायमोजे, पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती भर्रेगाव कडून टाय बेल्ट आणि श्री. चाचेरे ग्राम विकास अधिकारी यांनी गोड जेवणासाठी लाडूची सोय करून दिली. कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेतर्फे अतिथीगणाचे शाल श्रीफळ देऊन आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री. मनोज गेडाम मुख्याध्यापक व आभार प्रदर्शन श्री. सचिन सांगळे स. शि. यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. कांगणे प. शि, श्री. ताराम स. शि.,. संगीताताई बावनकुळे मु. यु. का. प्रशिक्षणार्थी,. शारदाताई मेश्राम, प्रियंकाताई मेश्राम अंगणवाडी सेविका, सौ. दुर्गाताई मेश्राम आशा स्वयंसेविका तसेच शा. व्य. स. चे सदस्य मयाराम पंधरे, मुकुंदराज शेंडे, खुशाल कुंभरे, दुलीचंद सलामे, अनिलजी बावणे, हेमलताताई वरचो, सविताताई लाडे, कविताताई दिघोरे, संजय मडावी, रेवचंदजी खोटेले संगणक परिचालक, मोहनजी कोचे परिचर, विवेकभाऊ रोजगार सेवक, शाळा व अंगणवाडीतील मदतनीस इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें