देवरी: छत्रपती शिवाजी हायस्कुल देवरी येथे चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता दिनांक 23 जून 2025 पासून शाळा सुरु होत असल्याने पूर्व तयारीचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुचना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना देण्यात आल्यात तसेच शासनाच्या विविध योजनाची माहिती देण्यात आली.
आजच्या सभेला अध्यक्ष म्हणून अनिल बिसेन, सभापती पंचायत समिती देवरी उपस्थित होते तसेच महेंद्रजी मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवरी, राऊत सर विस्तार अधिकारी, कावळे सर गट समन्वयक उपस्थित होते. अध्यक्ष यांनी उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले.
शासनाच्या विविध योजना बाबद सविस्तर माहिती गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी दिली. शालेय पोषण आहार योजनेबाबद माहिती श्री राऊत सर यांनी दिली. नवभारत साक्षरता कार्यक्रम बाबद माहिती श्री भरणे सर यांनी दिली व Udise बाबद माहिती संजय मेश्राम यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन यज्ञराज रामटेके सहा. शिक्षक यांनी केले तर आभार लाडे सर केंद्र प्रमुख यांनी मानले.
सभा यशस्वी पणे होण्याकरिता उमेश भरणे, रमेश पटले, शंकर वलथरे, प्रमोद शिंगनजुळे, राकेश शहारे यांचे सहकार्य लाभले.








