सेवानिवृत्त प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा संपन्न

◼️देवरी तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

देवरी: तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याधापक संघ देवरीच्या वतीने नुकतेच सेवानिवृत्त झालेले गुलाब जनबंधू मुख्या. महात्मा गांधी विद्या. तथा कनिष्ठ महा. पालांदुर/जमी., एस.आय.शेख मुख्या. शंकरलाल अग्रवाल विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय फुक्कीमेटा, संतोष बुराडे मुख्या. बाबुराव मडावी विद्यालय देवरी , रमेश दोनोडे मुख्या. आदिवासी विकास राजश्री माध्यमिक विद्यालय कडिकसा यांचा सत्कार सोहळा ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे थाटात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.एस. हुकरे अध्यक्ष गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघ, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष दुबे, प्रमुख अतिथी मुख्याधापक टी. एस. कटरे, प्राचार्य महेंद्र मेश्राम , प्राचार्या रजिया बेग यांच्या सह सत्कारमूर्ती मंचावर स्थानपन्न होते. 

यावेळी सेवानिवृत्त त्यांचा सपत्नीक ह्दयसत्कार समारंभ मुख्याध्यापक संघाच्या वतीने शाल श्रीफळ ,भेट वस्तू व सन्मान चिन्ह ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. 

व्यासपिठावर संघाचे अध्यक्ष सुभाष दुबे यांनी प्रास्ताविकेतून संघाची परंपरा विषयी प्रकाश टाकला. यांच्या सेवेतील आठवणी जाग्या केल्या. प्रमुख अतिथिनी संघटना कशी वाढवायची आणी संघटन कसे करावे , त्यांच्याकामाची पध्दत,शिस्तप्रिय, कर्तव्य दक्ष आणी क्षमाशील अशी वर्तणूक यावेळी व्यक्त केली. शिक्षक सेवेत असताना अनेक विद्यार्थीघडवून आदर्श विद्यार्थी कसा घडवला पाहिजे सत्कारमूर्ती बुराडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम विद्यालयाचे मुख्याद्यापक जीतेंद्र रहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन पूर्व अध्यक्ष प्राचार्य विनोद गिर्हेपुंजे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशासाठी संघाचे पुर्व अध्यक्ष मुख्याध्यापक विनोद गिरहेपुंजे, महेंद्र मेश्राम, रझिया बैग , अजय पटले , जी. एम . मेश्राम, मनोज भुरे, तसेच उपस्थित सर्व मुख्याध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.

Share