देवरी येथील केशोरी तलाव स्वच्छता अभियान

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने “पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा ” या उपक्रमाला मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सेवा परमो धर्म! या हेतूने केशोरी तलावाच्या पाण्यात असलेल्या कचऱ्याची सफाई केली.पृथ्वी,आप,तेज, वायू व आकाश या पंचतत्वाचे पावित्र्य जपण्यासाठी प्रत्येक माणसांनी प्रयत्न करावे,हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून रासेयो स्वयंसेवकांनी आपल्या सेवेतून दिला.
“टाळा पृथ्वीची लूट, न भरणारी निसर्गाची तूट”, प्रदुषण करू नका, पृथ्वीला कष्ट देवू नका. सर्व नागरिकांनी पृथ्वीचे संरक्षण करणे अनिवार्य आहे. असा संदेश जनमानसापर्यंत पोहचणे गरजेचे आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व जनतेने पर्यावरण संरक्षण करावे असे आवाहन केले आहे.
या अभियानात मार्गदर्शक प्राचार्य जी. एम.मेश्राम, पंचायत समिती देवरीचे विजयकुमार लोथे, उपमुख्याध्यापक एस. पी.देशमुख यांनी आपली जबाबदारी पार पाडली. या उपक्रमात पी.आर.मनगटे,एस.एस.अंबुले,एस.आर.निमजे,ए.बी. झंजाळ,पी.व्ही. कापगते,जे.जी.खेडकर व रासेयो स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.

Share