ध्येय गाठण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करा: प्रा.डॉ. सुजित टेटे

◾️ब्लॉसम स्कुल तर्फे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ संपन्न

देवरी : तालुक्यातील अग्रगण्य आणि लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी तर्फे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आले.सदर निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे , शिक्षक नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , नामदेव अंबादे , तेजस्विनी नंदेश्वर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रत्येक आव्हान स्वीकारावा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठीण परिश्रम आणि आत्मविश्वासच्या बळावर जीवनाला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडावी असे मत प्रा. डॉ. सुजित टेटे यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी आपली मते व्यक्त करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी स्विकारत नृत्य आणि खेळाच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्था अग्रवाल , मेघा तावाडे, श्रिया रेळकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकत्रित अल्पोपहारानी झाली. कार्यक्रमाचे यशासाठी विद्यार्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें