३ महिन्यापूर्वी झाली होती पोलीसात भरती, अपघातात स्मिता सुर्यवंशीचा दुर्दैवी अंत
प्रहार टाईम्स : सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा – गोंदिया मार्गावर डव्वा – खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही एस.टी.बसच्या भिषण अपघातात ११ प्रवासी मृत झाल्याची घटना घडली. दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. यामधे अर्जुनी मोर. येथील स्मिता सुर्यवंन्सी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे.
या अपघातात मृत्यु झालेली स्मिता सुर्यवंन्सी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते. त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते. त्यामुळे स्मिता सुर्यवन्सी यांच्यावर मोठा आघात झाला होता. आपले सासु सासरे व एका छोट्याशा बाळासह हालाकीचे जिवन जगत असताना स्मिता हिला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन तिन महिण्यापुर्वीच नोकरी मिळाली होती. आपले परिवारांना भेटुन स्मिता आज 29 नोव्हेंबर ला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोर वरुन साकोली ला गेली आणि गोंदियाला जाण्यासाठी याच अपघातग्रस्त बसनी जात असता हा दुर्देवी अपघात घडल्याने स्मिता चा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने अर्जुनी मोर शहरांसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.