आमगाव विधानसभा संघाकरिता गृह मतदान

देवरी: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणुकीकरिता ६६-आमगाव विधानसभा मतदार संघा करिता आज दि.९ नोव्हेंबर २०२४ रोजी गृह मतदान करण्याकरिता पथकांना रवाना करण्यात आले आहे. गृह मतदान सुरू होण्यापूर्वी मतदारांना गृह मतदान होणार असल्याबाबतचे बीएलओ यांचे मार्फत लेखी सूचना करण्यात आले होते. तसेच निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी सदर दिनांकास आपले प्रतिनिधी उपस्थित राहण्यासंबंधी सूचना निर्गमित करण्यात आले होते. गृह मतदान दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ व ज्या मतदारांचे सदरील दिनांकास मतदान होणार नाही. त्यांचे मतदान दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.

 ६६- आमगाव विधानसभा मतदारसंघात पीडब्ल्यूडी (दिव्यांग) २७ तसेच ८६+( जेष्ठ नागरिक) ९८ असे एकूण १२५ मतदार असून, त्यांचे मतदान आज दिनांक ०९ नोव्हेबर २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. सदरचे मतदान घेण्याकरिता मतदान पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस शिपाई व सूक्ष्म निरीक्षक याप्रमाणे प्रत्येक पथकात नेमणूक केलेली होती.एकूण तेरा पथकाद्वारे गृह मतदान घेण्यात आलेली असून, दुसऱ्या दिवशी सुद्धा ज्यांचे मतदान झाले नाही अशा मतदारांचे मतदान घेण्यात येणार आहेत. तरी मतदारांनी मतदान पथक आपल्या दारी आल्यास मतदान करावे असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी यांनी आवाहन केले आहे.

Share