६६-आमगाव मतदार संघात ईव्हीएम मशीन चे दुसरे रेडमाइझेशन संपन्न

देवरी: आमगाव विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान केंद्रावर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) मशीनचे दुसरे रेडमाइझेशन ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन नुसार पार पडली.  ६६ आमगाव विधानसभा मतदार संघातील ३११ मतदार केंद्राकरिता बी.यु. ३७३, सी.यु. ३७३ व व्हिव्हीपॅड ४०४ राखीव मतदानासह प्राप्त झाले. त्या अनुषंगाने ६६ आमगाव विधानसभा मतदारसंघाचे झालेल्या दुसरे रेडमाइझेशन प्रक्रियेला निवडणूक निरीक्षक नितीन भदोरिया, निवडणूक निर्णय अधिकारी कविता गायकवाड यांची उपस्थिती होती. यासोबतच निवडणुकीत उभे असलेल्या विविध राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या प्रक्रियेत बी.यु. (बॅलेट युनिट), सी.यु. (कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल)मशीनचे दुसरे सरमिसळ करण्यात आले.

यावेळी उपस्थिती प्रतिनिधींना स्क्रीनवर विविध ईव्हीएम मशीन चे सरमिसळ प्रात्यक्षिकरित्या करून दाखविण्यात आले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रावर कुठली मशीन कोणत्या ठिकाणी जाणार आहे रँडम पद्धतीने ठरविण्यात येते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासाहर्ता सुनिश्चित होते. या प्रात्यक्षिकानंतर उमेदवाराच्या प्रतिनिधींनी ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि विश्वासार्थ असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. 

यावेळी निवडणूक निरीक्षक व इतर अधिकारी यांच्या उपस्थिती राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासमोर दुसरे राडमायझेशन पार पाडण्यात आली. सदर प्रक्रिया दरम्यान निवडणूक खर्च निरीक्षक नागेदर भुकीया तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देवरी,आमगाव व सालेकसा यांची प्रामुख्याने उपस्थित होती.

Share