देवरी ◾️ पोलीस अधीक्षक गोरख भामरे गोदिया, नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कैंम्प देवरी , विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरीचे मार्गदर्शनात व प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांनी पो. स्टे. हद्दितील इसम नामें प्रमोद शहारे वय ४२ वर्ष रा. मुरदोली ता. देवरी जि.गोंदिया याला हद्दपार केले आहे.
सविस्तर असे की, हा इसम देवरी पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध दारु बाळगुन दारु विक्री करणे अशा प्रकारचे गुन्हें करीत असल्याने त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करने कामी मा. उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१),(अ) प्रमाणे त्याचे विरुध्द प्रस्ताव तयार करुन पाठविले असता सदर प्रकरणाची कविता गायकवाड उपविभागिय दंडाधिकारी देवरी यांनी चौकशी व सुनावणी करुन नमुद इसमाला देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्याच्या बाहेर २ महिन्याकरीता हद्दपार केले आहे.








