ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे माहिती अधिकार दिन साजरा

देवरी ◾️स्थानिक ब्लॉसम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुजित टेटे, शिक्षक नामदेव अंबादे, भोजराज तुरकर, नितेश लाडे, सरिता थोटे, वैशाली मोहुरले मंचावर उपस्थित होते. त्यानिमित्त माहितीचा अधिकार या विषयावर प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी यावेळी माहितीच्या अधिकाराचा इतिहास ते अद्ययावत स्थिती याबाबत सविस्तर विवेचन केले. माहिती अधिकार कायद्यातील कलमांविषयीही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले . माहिती अधिकाराचा सदुपयोग, अधिनियमाची परिवर्तन शक्ती आदी पैलूंवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळेतील ८ वी ते १० वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाली मोहूर्ले यांनी केले असून सरिता थोटे यांनी आभार मानले.

Share