राष्ट्रीय सेवा योजना दिनाचा कार्यक्रम साजरा

देवरी -स्थानिक मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.जी.एम. मेश्राम, प्रमुख उपस्थितीत श्री.एस.पी.देशमुख,सौ.एस.डी. गजभिये मॅडम उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी सर्व मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.मा. जी.एम.मेश्राम सरांनी आपल्या भाषणातून सेवाभावी वृत्ती प्रत्येक स्वयंसेवकांनी जोपासावी, अशा आशयाचे भाषण केले. अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अश्विनी झंजाळ यांनी केले तर आभार कु. पूजा कापगते यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो.प्रमुख जे.जी.खेडकर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Share