उद्या देवरी येथे ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचा जिल्हास्तरीय सत्कार सोहळा

देवरी – अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी,अंतर्गत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग जिल्हा गोंदिया च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ग्रामगीता जीवन विकास परीक्षेअंतर्गत ग्रामगीताचार्य,ग्रामगीतारत्न, परिचय, प्रवीण, प्रवेश या परीक्षेत जिल्ह्यातील आणि तालुकानिहाय प्राविण्य प्राप्त परिक्षार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते उद्घघाटन तर केंद्रीय प्रचार विभागाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील,माजी आमदार संजय पुराम, गुरुकुंज आश्रम मोझरी चे उपसर्वाधिकारी दामोदर पाटील गुरुजी,परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाब खवसे, उपाध्यक्ष प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे,केंद्रीय प्रचार विभागाचे सचिव सुशील वणवे महाराज, भाजप चे संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर,देवरी नगर पंचायत अध्यक्ष संजय उईके,उपाध्यक्ष सौ.प्रज्ञाताई संगीडवार,नगरसेवक आफताब शेख,गोपाल कडू,राधेश्याम निमजे,सुखदेव वेठे,मुन्नालाल ठाकुर गुरुजी,विरेंद्र चन्ने आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात जास्तीत जास्त गुरुदेवभक्त आणि नागरिक बंधू भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Print Friendly, PDF & Email
    Share