सुरू केलेली दहीहंडी उत्सवाची परंपरा कायम ठेवणार- मा. आमदार संजय पुराम
देवरी – दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा भारतीय जनता पक्ष तथा युवा मोर्चाच्या वतीने आणि माजी आमदार संजय पुराम व माजी खासदार अशोक नेते यांच्या विशेष सहकार्याने ३१ ऑगस्ट शनिवारला भव्य दहीहंडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
२०१४ ला आमदार झाल्यापासून देवरीच्या विकासासाठी कटिबद्ध असून येणाऱ्या काळात सुद्धा देवरीच्या विकासासाठी झटणार असल्याचे संजय पुराम यांनी दहीहंडी उत्सवात भावना व्यक्त केल्या. यावेळी देवरी परिसरातील युवा तरुणासोबत संजय पुराम यांनी गोविंदा आला रे गाण्यावर ठेका हरित सर्वांचे मने जिंकली.
दुपारी १ वाजता अग्रसेन चौकातून दहीहंडी स्पर्धेला सुरुवात झाली असून दुर्गा चौक, कारगील चौक आणि शेवट नगर पंचायतच्या पटांगणावर दहीहंडी फोडोचे कार्यक्रम संपन्न झाले असून स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सदर स्पर्धेत प्रमोद संगीडवार, अनिल बिसेन, अनिल येरणे, विजय गहाणे, संजय उईके आणि रितेश अग्रवाल यांच्या कडून प्रत्येकी अकरा हजार एक रुपयांचे एकूण पाच बक्षीसदेण्यात आले असून सोबत आकर्षक शिल्ड सुद्धा देण्यात आले .
सदर कार्यक्रमाला मूर्तरूप देण्यासाठी इंदरजीतसिंग भाटीया, राजू शाहू , नितेश वालोदे, दिशांत चन्ने, विलास शिंदे, सुशील जैन, दिनेश भेलावे, सोनू चोपकर, माजीद खान, इमरान खान आणि दिपक शाहू यांच्यासह भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.