शिक्षकदिनी विधानसभा क्षेत्रातील गुणवंत शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आमदार कोरोटे यांचे हस्ते सत्कार

देवरी ◾️ पंचायत समिती देवरी अंतर्गत येत असलेल्या गुणवंत शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आमदार कोरोटे यांचेहस्ते 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचित्य साधनु सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आफताब मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. याबाबद गटशिक्षणाधिकारी देवरी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी पत्राद्वारे कळविले आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचित्य साधुन आमगांव देवरी विधानसभा क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संघटनाचे पदाधिकारी, अधिकारी व गुणवंत शिक्षक आणि आदर्श पुरस्कृत शाळा यांचे दि. 05/09/2024 ला सकाळी 11.30 वाजता आफताब मंगल कार्यालय देवरी येथे सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक (सर्व व्यवस्थापनाच्या शाळा) यांनी दि. 05 सप्टेंबर 2024 ला सकाळी 11.30 वाजता आफताब मंगल कार्यालय देवरी येथे उपस्थित राहावे असे पत्रात नमूद केले आहे.

Share