भारतीय जनता पार्टी देवरी मंडळची विस्तारित बैठक संपन्न

देवरी ◾️भारतीय जनता पार्टी देवरी मंडळ ची विस्तारित बैठक आज दि.११ ऑगस्ट भाजप कार्यालय देवरी येथे संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विविध विषयावर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीसाठी थोडाच अवधी आता शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना अधिक उर्जेने काम करायचे आहे. पुन्हा जोशाने आणि जोमाने मैदानात उतरायचे आहे.असे आवाहन करण्यात आले. आपल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत जनहितासाठी राबविण्यात आलेल्या योजना, कल्याणकारी निर्णय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या “नारा सबका, साथ सबका” विकास यानुसार आपल्याला आता काम करायची आहे. असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी, महिला, कामगार, कष्टकरी,विद्यार्थी यांसाठी राबविलेल्या आणि राबवित असलेल्या विविध योजनांची यावेळी सर्वांना माहिती दिली. आणि ही माहिती सर्वांनी प्रत्येक जनसामान्य नागरिकापर्यंत कशी पोहोचवावी याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले.
या बैठकीला प्रामुख्याने विजय शिवणकर माजी जि. प. अध्यक्ष, प्रमोद संगीडवार,झामसिंग येरणे, महेश जैन, भरतसिंग दुधनांग, सविताताई पुराम,अंबिकाताई बंजार, कल्पनाताई वालोदे, संजू उईके, अनिल बिसेन, प्रज्ञाताई संगिडवार, अनिल येरने, सुखचंद राऊत, श्रीकृष्ण हुकरे,लक्ष्मण नाईक, केशवराव भुते, सर्व पंचायत समिती सदस्य,सर्व नगरपंचायत सदस्य ,आघाडी प्रमुख, सर्व बुध अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुख, जेष्ठ महिला तसेच युवा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Share