देवरी तालुक्यातील जिप शाळेच्या इमारतीला लागली गळती, वर्ग खोल्यात साचले पाणी

देवरी◾️तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील मिसपीर्री ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या धमदीटोला येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील वर्गाची इमारतीला पावसाच्या पाण्यमुळे गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. तालुक्यात गत काही दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. याचा फटका धमटीटोला येथील शाळेलाही बसला आहे. शाळेतील वर्गखोल्या पावसाच्या पाण्यामुळे गळत असून जमिनीवर पाणी साचून राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण झाले असून शिक्षकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

यावरून शासन आणि प्रशासन देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्क कायद्यानुसार सोयी सुविधा पुरविण्यास असमर्थ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Share