गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संघाच्या संचालकपदी सरबजीतसिंग भाटिया

देवरी ◾️ नगरपंचायत देवरीचे गटनेता तथा नगरसेवक सरबजीत ( शैंकी) भाटिया यांची गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संघाच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी अध्यक्ष बंटी मिश्रा, दीपक कदम, राजू जैन, भैयलाल चांदेवार उपस्थित होते. यावेळी गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संघाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल परिवारातील सदस्य , मित्रपरिवार यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Share