शासकीय निवासी शाळांमध्ये (घडयाळी) तासिका मानधन तत्वावर सहा. शिक्षकांची नियुक्ती करीता अर्ज आमंत्रित

गोंदिया◼️सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत गोंदिया जिल्हयातील कार्यरत असलेल्या मुलांची/ मुलींची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा (मुर्री), डव्वा व सरांडी, जि. गोंदिया या शाळांमध्ये वर्ग ६ वी ते १० वी च्या अभ्यासक्रमासाठी शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेशित मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित शिक्षक नियुक्त होईपर्यंत निवासी शाळांमध्ये (घड्याळी) तासिका तत्वावर (निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात) सहा. शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा (मुर्री), ता. जि. गोंदिया येथे वर्ग ६ वी ते ८ वी करीता १ पद शैक्षणिक पात्रता बी.ए./बी.एस्सी. डी.एड (इंग्रजी/गणित), वर्ग ९ वी ते १० वी करीता-४ पदे शैक्षणिक पात्रता बी.एस्सी/ एम.एस्सी.बी.एड. (गणित/संगणक), बी.ए./एम.ए.बी.एड. (इंग्रजी/शारीरिक शिक्षण), बी.ए./एम.ए.बी.एड. (हिंदी कला), बी.ए./एम.ए. बी.एड. (मराठी/सामाजिक शास्त्र) (एम.एस.सी.आय. टी. आवश्यक राहील)

मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे वर्ग ६ ते ८ वी करीता-१ पद, बी.ए. डी.एड. वर्ग ९ वी ते १० वी करीता-३ पदे, शैक्षणिक पात्रता बी.ए.एम.ए.बी.एड, (मराठी/सामाजिक शास्त्र), बी.ए.एम.ए.बी.एड, (हिंदी/भुगोल), बी.एड./एम.एस.-सी.आय.टी. (विज्ञान/संगणक).

मुलींची शासकीय निवासी शाळा, डव्वा, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथे वर्ग ६ वी ते ८ वी करीता -२ पदे शैक्षणिक पात्रता बी.ए. बी.एड/डी.एड (मराठी/हिंदी), बी.ए. (इंग्रजी), बी.एड/डी.एड, वर्ग ९ वी ते १० वी करीता -३ पदे शैक्षणिक पात्रता बी.एस्सी/एम.एस्सी.बी.एड, (विज्ञान), बी.ए/एम.ए. बी.एड (मराठी/सामाजिक शास्त्र), बी.ए/एम.ए., बी.एड (हिंदी), पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

याकरीता इच्छूक प्रशिक्षीत उमेद्वारांनी संबंधीत शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक यांचेकडे सर्व कागदपत्रासह अर्ज दिनांक २२/०६/२०२४ पर्यंत सादर करावे. (अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल) तसेच मुलाखतीसाठी दिनांक २४/०६/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता अनु. जाती व नवबौध्द् मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा (मुर्री), ता. जि. गोंदिया येथे मुळ सर्व कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे. तसेच सविस्तर माहितीकरीता संबंधीत निवासी शाळेतील मुख्याध्यापक व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया यांचे कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी केले आहे

Share