देवरी येथे एकाच रात्री ६ ठिकाणी चोरी, देवरीवाशी असुरक्षित?
◼️महावीर मिल मधे पुन्हा चोरी, CCTV च्या आधारे तपास सुरू
देवरी ◼️ मागील काही दिवसात देवरी शहरात चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. यामध्ये मोटार सायकल, मोबाईल फोन चोरीला जाण्याचे घटना ताजे असतांना दिनांक ०४/०४/२०२४ चे २२:०० वा. ते दिनांक ०५/०४/२०२४ चे ०८:०० वा. दरम्यान यांतील फिर्यादी कुलदिप विरेंद्र अगडे, वय ३१ वर्षे, रा.वार्ड क्र. ०१ देवरी, याचे एन एच ०६ रोड लगत असलेल्या मालकीचे ‘अगडे हार्डवेअर’ दुकानात दैनंदिनी व्यवहाराचे काउंटर चे ड्राव्हर मध्ये ठेवलेले नगदी ६२,०००/- रू तसेच फिर्यादीच्या दुकाना लगत असलेले बलविंदर भाटीया ऑटो मोबाईल दुकानातील अंदाजे ५,०००/- रू व मंसाराम पंजरेत्रिरंबे ऑटो इलेक्ट्रनिक्स यांचे अंदाजे नगदी ५०००/- रू असे एकुण नगदी ७२,०००/- रूपये कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले तसेच महिद्रा फायनॅन्स कार्यालय देवरी चे शटर तोडुन कार्यालयाचे लॉकर तोडण्याचा प्रयत्न केले व पायघन रा. शिक्षक कॉलोनी, देवरी यांचे घरातील दरवाजाचे लॉक तोडुन घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे लॉकर तोडुन अज्ञात चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोस्टे देवरी येथे अप क. १०२/२०२३ कलम ४५७, ३८०,५११ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि गंगाकाचुर पोस्टे देवरी, हे करीत आहेत.