येत्या शनिवारी देवरी येथे भव्य दहीहंडीचे आयोजन

प्रहार टाईम्स 

देवरी ७: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर भव्य दही हंडी स्पर्धेचे आयोजन ९ सप्टेंबर ला दुपारी ११ वाजता पासून देवरी येथे विविध ठिकाणी करण्यात आले आहे.

याप्रसंगी बक्षिसांचा वर्षाव स्पर्धकांवर होणार असून विविध ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विजय चमूंना विशेष नगद पारितोषिक देण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त संख्येने दहीहंडी स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share