सिध्दार्थ विद्यालयात ग्रंथमित्र अॅड. डॉ श्रावण उके यांचा ८३ वा वाढदिवस साजरा

देवरी ◼️ सिध्दार्थ हायस्कुल सलग्न कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय डवकी येथे ग्रंथमित्र अॅड. श्रावण उके यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमीत्त शाळेच्या ग्रंथालयाला ८३ ग्रंथ भेट देवुन ग्रंथ हेच गुरु यानुसार त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. महेन्द्र मेश्राम (प्राचार्य), प्रमुख वक्ता प्रविण डांगे (पो. निरिक्षक) पोलीस स्टेशन देवरी, अँड. प्रशांत संगीडवार, अॅड. सचिन बावरीया प्रमुख उपस्थितीत , राधेशाम बगडीया माजी सभापती प.स. देवरी, विष्णु अग्रवाल उद्योगपती देवरी मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राध्यापक रामटेके सर, तसेच समस्त उके परिवाराच्या उपस्थितीत हा वाढदिवस मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरानी शाळेतील विद्यार्थ्याना ग्रंथाचे महत्व आपल्या जीवनात किती आहे या विषयी मार्गदर्शन करून शाळेतील सर्व कर्मचारीवृंद विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी अॅड. डॉ. श्रावण उके याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुषमा जवजार तर आभार प्रदर्शन जागेश ठवरे यानी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांचा मोलाचा सहभाग लक्षणीय ठरला. सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त बिस्कुट पुडे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Print Friendly, PDF & Email
Share