पोलीस स्टेशन चिचगड येथे जी.एस.एफ. सुरक्षा रक्षक भरती रोजगार मेळावा

देवरी ◼️ पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतुन व अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, विजय भिसे उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव अतिरीक्त कार्यभार देवरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातुन स.पो.नि. शरद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दादालोरा खिडकी योजने अंतर्गत दिनांक २२/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन चिचगड येथे जी.एस.एफ. सुरक्षा रक्षक भरती रोजगार मेळावा घेण्यात आला सदर मेळावा स.पो.नि.सुमेध खोपीकर सा. यांचे उपस्थितीत घेण्यात आले. सदर रोजगार मेळाव्यास ३२ नवयुवकांनी सहभाग घेतला असून त्यापैकी ०६ नवयुवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share