देवरी🚨वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

देवरी ◼️ रोजंदारीचे काम करून देवरीवरून रात्री गावी जात असतांना भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याने उपचारादरम्यान दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात चिचगड रोडवरील अब्दुलटोला येथे सोमवार रात्री 8.30 वाजता दरम्यान घडला. यामध्ये मृत मानिकचंद चौधरी वय ४८ वर्षे राहणार नकटी येथील रहिवासी आहे.

दुचाकी चालक मानिकचंद चौधरी हे दुचाकीने देवरीवरून सायंकाळी 8.30 वाजता आपल्या गावी नकटी येथे चिचगड रोड मार्गे जात असतानां चिचगड रोडवरील अब्दुलटोला गावा नजिक समोर जात असलेल्या चारचाकी वाहन क्रमांक MH 35 AJ 1857 ने ब्रेक लावल्याने मानिकचंद चौधरी यांची दुचाकी चारचाकीच्या मागच्या भागाला जोरात आदळली त्यात चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे. रात्रीची वेळ असल्याने व म्रुत मानिकचंद हे घटना स्थळीच पळुन असल्याने व वेळेवर उपचान न मिळाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान देवरी ग्रामीण रुग्णालयात म्रुत्यु झाला. घटनेतील वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरुन पसार झाला असला तरी चारचाकी वाहनाची मागील नंबर प्लेट घटनास्थळी पडलेली मिळाली आहे. सदर घटनेची नोंद देवरी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली सदर घटनेचा तपास देवरी पोलिस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share