आ. कोरोटे यांचे अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

देवरी ◼️ राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विशेषतः गोंदिया जिल्ह्यात आमगाव देवरीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना मदत मिळावी या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून विनंती केली आहे.

सदर निवेदनात राज्यात गोंदिया जिल्ह्यात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये रब्बी पिकांची लागवड करण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच गारपीठ आणि सततचा पडणारा अवकाळी पावसामुळे आमगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे जगण्याचे शेती हेच एकच साधन असून शेती पूर्णपणे निकामी झालेली आहे. ९० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असून अजूनही अवकाळी पाऊस थैमान घालून आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत संबंधीतांचे सर्वे करून नुकसान भरपाई संबंधीची पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार कोरोटे यांनी केली आहे.

Share