ब्रेकिंगः देवरीच्या महावीर रॉइस मिल मधे ५ लाखाची चोरी, घटना सीसी टीव्ही मधे रेकॉर्ड

देवरी ◼️ देवरी तालुक्यात चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून आज पहाटेच्या सुमारास महावीर राईस मिल मधे चोरी झाल्याची घटना उघड झाली. ही घटना चक्क सीसीटीव्ही मधे रेकॉर्ड झाली.

नरेंद्र जैन यांच्या मालकीचे महिवीर राईस मिल येथे ५ लाख रुपयाचा दरोडा चक्क सीसीटीव्ही मधे कैद झाला आहे. सकाळी ५ च्या सुमारास देवरीच्या अग्रसन चौकातील मिल मधे चक्क रहदारीच्या ठिकाणी हा दरोडा झाला असून रॉड ने ३ दारांचे कुलुप तोडून चोरी झाली आहे.

सदर घटना स्थळी पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरु झाला आहे.

Share