मुलाने केली वडीलांची हत्या
गोंदिया ◼️तिरोडा तालुक्यातील बोधा येथे मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत वडीलांचा मृत्यू झाल्याची घटना 25 मार्च रोजी घडली. भैय्यालाल नागदेवी (55) असे मृतकाचे नाव आहे.मृतक भैय्यालाल नागदेवी याला दोन पत्नी असून तो आपल्या पहिल्या पत्नीसह गावातील बौद्ध विहारात राहत होता. तर त्याचा लहान मुलगा लंकेश नागदेवी त्याच्या दुसर्या पत्नीसोबत गावात राहात होता.
भैय्यालाल व त्याच्या मुलामध्ये नेहमीच कौटूंबिक वादातून भांडण व्हायचे. 24 मार्च रोजी लंकेशने शेतीच्या कामासाठी भैय्यालालकडील ट्रॅक्टर घेऊन गेला. दरम्यान भैय्यालाल 25 मार्च रोजी ट्रॅक्टर परत घेण्याकरिता गेला असता त्यांचा लंकेशसोबत वाद झाला. यावेळी लंकेशने केलेल्या बेदम मारहाणीत भैय्यालालचा (kill father) जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर लंकेशने पळ काढला. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी भादंवि 302, 504 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सतीश जाधव करीत आहेत.