गोंदियात आजपासून कृषी महोत्सव

गोंदिया ◼️जिल्हा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, महिला व बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 23 ते 27 मार्च या कालावधीमध्ये शहरातील मोदी मैदान, बालाघाट टी पॉईंट येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मनगंटीवार यांच्या हस्ते होईल.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले राहतील, प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे, आ. अशोक नेते, आ. अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडबले, आ. विजय रहांगडाले, आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, जिपचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड उपस्थित राहतील. महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे १५० स्टाल तसेच कृषी विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share