Video: गोंदिया जिल्हा पोलीसांचा “पोलीस दादालोरा खिडकी” उपक्रम, अनेक शासकिय योजनांचा मिळणार लाभ

◼️योजनांची सविस्तर माहिती व्हीडीओ मधे दिलेली आहे

गोंदिया ◼️ आदिवासी , मागासलेला आणि नक्षल प्रभावित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या ग्रामीण लोकांना शासकिय योजना, विविध सेवा , दाखले आणि सेवा मिळण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम गोंदिया जिल्हा पोलिसांनी पोलीस दादालोरा खिडकी उपक्रम हाती घेतलेला आहे.

सदर उपक्रमाची सुरुवात गोंदिया पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हातील सर्व पोलीस स्टेशन, दूरक्षेत्र या ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

Share