वाघ व अस्वलाच्या अवशेषाच्या तस्करी प्रकरणी देवरी तालुक्यातील आरोपीस अटक

◼️लाखो रुपयाची रोकड आणि जनावरांचे अवशेष जप्त

देवरी ◼️वाघ व अस्वलाच्या अवशेषाची तस्करी प्रकरणी आरोपी रवी बोडगेवार (अन्ना) वय अंदाजे 50 वर्षे रा. पालांदुर जमी, ता.देवरी, जि. गोंदीया याला सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास चिचगड वनविभाग व चिचगड पोलिस प्रशासनाकडुन अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीच्या नुसार , चिचगड वन विभाग व चिचगड पोलिसांनी रवी बोडगेवार (अन्ना) याच्यां घराची आज सकाळी 5.00 वाजता पासुन झळतीला सुरुवात केली. त्यात वनविभाग व पोलिसांना आरोपीच्या घरातुन बोरीत भरलेल्या लाखोरुपयांच्या रोकडसह वाघ व अस्वलांची नखे व अवशेष मिळालेली आहेत. सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे. रवी बोडगेवारच्या अटकेने जंगली जनावरांची शिकार आणि तस्करी करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपीस चिचगड पोलिस व वनविभाने ताब्यात घेतले.

Share