स्व.पूर्णचंद्र डोये यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे देहदान

प्रहार टाईम्स

देवरी ◼️ मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही उक्ति सर्वाच्या परिचयाची आहे. असाच एक स्तुत्य निर्णय देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील डोये कुटिंबीयांनी घेतला आहे. स्व. पुर्णचन्द्र रामकृष्ण डोये, (वय ८४ वर्ष)डोंगरगांव/सावली हे सन १९६१ मध्ये डोंगरगांव चे पहिले सरपंच होते त्यांनी १५ वर्षे त्यांनी सरपंच पदाच कार्यभार सांभाळून गावविकासाची कार्ये बजावले. दि.२०/१/२०२३ ला सांय.५ ला त्यांचे आकस्मिक/वृध्दापकाळ/ आजारामुळे निधन झाले.

मृत्यूनंतरही त्यांचे शरीर शरीररचनाशास्त्र विभागात अभ्यासासाठी उपयोगात यावे या उद्देशाने त्यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे २० जानेवारीला रात्री ९:५० वाजे पार्थिव शरीर त्यांचे लहान बंधु श्यामभाऊ डोये प्रसीद्ध शिल्पकार व त्यांच्या परिवाराच्या सहमतीने देह देण्यात आले.

व आज दि.२४/१/२०२३ ला शा. वै. म. गोंदिया, यांचे कडून देहदान अनमोल कार्याकरिता प्रमाणपत्र देण्यात आले. सदर कुटुंबाच्या निर्णयाचा सर्वस्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share