तुला शोधताना

तुला शोधताना मी माझ्यातच हरवून गेलोय
या प्रेमाच्या गर्दीत मीच दुरावून गेलो
तूझ्या एका भेटीसाठी खुप दूर निघून आलो
मीच माझे अस्तित्व विसरून गेलो…..

तुला शोधताना मी वाहून गेलो
खरं प्रेम काय आहे हे जाणून गेलो
नात्यातील विश्वासाला समजून गेलो
माझंच प्रेम खरं हे मनाला सांगून दिलो

तुला शोधाताना तुझाच कधी होऊन गेलो
मी फक्त तुझा आहे हे भासवून गेलो
जन्मभर सोबत राहीन हे वचन देऊन गेलो
स्वतःला कृष्ण आणि तुला राधा हे समजून गेलो

तुला शोधताना तूझ्या साठीच झुरत गेलो
तूझ्या सोबतच जीवनाचे स्वप्न रंगवत गेलो
तु अशीच का बर वागतेस हा विचार करत गेलो
तु मला धोका देणार तरी पण तुलाच प्रेम करीत गेलो

तुला शोधताना
तुला शोधताना…….
✍️✍️ कवि. सुदर्शन एम. लांडेकर देवरी
. 9420191985

Share