अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

देवरी भारतातील सर्वात राजकीय मोठा पक्ष म्हणजेच सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष. या भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन ३० नोव्हेंबर बुधवारला देवरी तालुका भाजप कार्यालयात विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी रितसर प्रवेश करुन भाजपचा साथ धरला.*
यात मगरडोह येथील माजी सरपंच सेवंता मेडे, सरपंचपदाचे उमेदवार कल्पना मेडे, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना पुराम, गीता डोंगरे, निराशा पोरेटी, महेंद्र गावळ, संजय उसेंडी, सुखदेव वाढई, सतिश मेडे, यादोराव पोरेटी आणि इतर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय पुराम, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, महामंत्री प्रवीण दहीकर, विनोद भांडारकर, यशवंत गुरनुले, पं. स. उपसभापती अनिल बिसेन, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंदरजीतसिंग भाटीया, महामंत्री योगेश ब्राह्मणकर, विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष दिपक शाहू आणि इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share