श्रध्दा वालकरचा मारेकरी आफताब पुनावाला यास फाशीची शिक्षा द्याः भाजप महिला आघाडी देवरी
देवरी २१ः महाराष्ट्राची रहीवासी असलेल्या श्रध्दा वालकर या तरुणीची आफताब पुनावाला या दिल्लीत राहणाऱ्या युवकाने मे महीन्यात निर्घुण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराची झालेली विटंबनाही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा भाजपचे महीला आघाडी देवरी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत तहसीलदार देवरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले.
भारत देशात बेटी बचाव बेटी पढाओ अभियान राबविल्या जात असले तरी दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जलदगतीने या प्रकरणाचा खटला कोर्टात चालविण्यात यावा आणि आरोपी आफताब अमीन पुनावाला या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी निवेदन केलेली आहे.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी, प्रज्ञाताई सांगिडवार, कल्पनाताई वालोदे, शामकलाताई गावड, ममताताई अंबादे, वैशालीताई पंधरे, नुतनताई सयाम, कमलताई मेश्राम, पिंकीताई कटकवार, सिताबाई रंगारी, कौशल्याबाई कुंभरे , सुनिताताई गावळ आदि उपस्थित होते.