Gondia : फिर्यादी- सुमित अशोक उईके, रा.आर.पी.एफ. कॉर्टर, मेन पोस्ट ऑफीस जवळ, गोंदिया, हे दिनांक ०५/१०/२०२२ ते दिनांक ०७/१०/२०२२ पर्यंत बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने किंमती २,०२०००/- रुपयाचे चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रं. ६३९ / २०२२, कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार यांना चोऱ्या -घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून, गुन्हेगारांना अटक करुन तात्काळ गुन्हा उघड करण्याचे निर्देश व आदेशित केल्याने त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री.अशोक बनकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्री. सुनील ताजने यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत सूर्यवंशी पो. स्टे. गोंदिया शहर यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक वरील नमूद घरफोडीच्या अनुषंगाने तपास करीत होते.
पो. स्टे. गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी,अंमलदार हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
आरोपी नामे –
१) सोनु गोपाल चव्हाण वय ३८ वर्ष, रा. गौशाला वार्ड, गोंदिया,
२) राजेश भरत गायकवाड वय ४० वर्ष, रा. सेंदुरवाफा, जि. भंडारा,
३) मनिष ऊर्फ बुच्ची मन्नु कुलदिप वय २३ वर्ष, रा. दसखोली, गोंदिया यांना गुन्ह्या संबंधाने ताब्यात घेण्यात आले.
वरील नमूद तिन्ही आरोपी यांना गून्ह्या संबंधाने विचारपूस केली असता तिघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचेपासुन नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने- चांदीचे दागिने 1 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तिन्ही आरोपी हे दिनांक १८ / ११ / २०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि. सागर पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे निर्देश व आदेशानुसार पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि.सागर पाटील, यांचे नेतृत्वात पो. हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, मपोहवा. रिना चौव्हाण, अरविंद चौधरी, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, सुबोध बिसेन, पोना दिपक रहांगडाले, पोशि विकास वेदक, पुरुषोत्तम देशमुख, दिनेश बिसेन, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी कामगीरी केली आहे.









