ड्रायपोर्टसाठी जागा द्या सहा महिन्यात मंजूरीसह सुरु करुन देतो– नितीन गडकरी

दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार , 350 कोटीच्या कामाचे भूमीपूजन

गोंदिया 29 :गोंदिया जिल्हा तांदूळ उत्पादक असून इथला तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात होतो.त्याचे अर्थकारण कोट्यावधीचा घरात आहे.आता आलेल्या ड्रायपोर्टच्या मागणीनुसार रेल्वेच्या बाजुला असलेली 200 एकर जमीन दिल्यास सहा महिन्यात त्याला मंजूर करुन भूमीपूजन करण्याची घोषणा करीत खा.प्रफुल पटेलांनी यासाठी पुढाकार घ्यावे असे म्हणाले.या ड्रायपोर्टमुळे तांदळासोबतच अन्य पदार्थाच्या वाहतूकीसाठी सोय होऊन खर्च कमी होणार असल्याचे म्हणाले.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अनेक कामे जवळपास पूर्णत्वास आली असून काही कामे सुरु झाली आहेत. त्यांचे भूमीपूजन आज करण्यात आले आहे. शहरातील पश्चिम भागातील रिंग रोडचे भूसंपादन सुरु आहे. तर मागणी झालेल्या मेडिकल कॉलेज जवळील रिंग रोडला आजच मंजूरी देत असून पुढील सहा महिन्यात त्याचे भूमीपूजन करण्यात येईल. मात्र राज्य शासनाने प्रस्तावित रिंग रोड परिसरात आधी स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करावे.आम्ही रस्ते तयार करणार आणि त्यावर काही व्यापारी अधिक दराने जमीन विकणार असे होता कामा नये. या दर्जेदार रस्ते व पुलांमुळे निश्चितच गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. असे प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आज 29 मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते आमगाव-गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम, गोंदिया-बालाघाट रस्त्यावरील बसस्थानका जवळील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डानपुलाचे बांधकाम व गोंदिया शहरातील हड्डीटोली रेल्वे क्रॉसिंगवर उड्डानपुलाचे एकूण 349.24 कोटीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.यावेळी मंचावर खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल मेंढे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार सर्वश्री राजकुमार बडोले, गोपालदास अग्रवाल, केशवराव मानकर, राजेंद्र जैन, रमेश कुथे, हेमंत पटले, भेरसिंह नागपुरे, खोमेश्वर रहांगडाले,जि.प.उपाध्यक्ष इंजि.य़शवंत गणवीर,जि.प.सभापती संजय टेंभरे,रुपेश कुथे,माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री गडकरी म्हणाले की, आज तिरोडा-गोंदिया रस्त्यावरील 60 कोटीच्या उड्डानपुलाची घोषणा आपण करीत आहोत. जिल्ह्यात देवरी-आमगाव, गोरेगाव-गोंदिया रस्ता, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील वैनगंगा नदीवरील पुलाचे कामे जवळपास पुर्णत्वास आलेली आहेत. तर सौंदड येथे 130 कोटीच्या उड्डानपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रावणवाडी ते बालाघाट टी पॉईंट काम येत्या सहा महिन्यात सुरु होईल. जिल्ह्यातील महामार्ग निर्मिती दरम्यान अनेक नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. यात जलसंवर्धनाची अनेक कामे झाली असून मोठ्या प्रमाणात तलावांची निर्मिती करण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यास पांगोली नदीचे पुनर्जीवन करण्यात येईल असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी तांदळापेक्षा तेलबियांचे उत्पादन घेतल्यास ते जास्त फायदयाचे होईल. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे वापर शासनाने हाती घेतले आहे. आता शेतकऱ्यांनी अन्नदातासह ऊर्जादाता व्हावे असे ते म्हणाले. लवकरच नागपूर ते गोंदिया मेट्रोचे काम सुरु होणार असून 1 तास 5 मिनिटात वातानुकुलीत प्रवास शक्य होणार आहे. नागपूर ते गोंदिया, गोंदिया ते चंद्रपूर व चंद्रपूर ते नागपूर अशी रिंग मेट्रो असेल. यामुळे रोजगारासाठी येणे-जाणे सुलभ होईल असेही त्यांनी सांगितले.

खासदार सुनिल मेंढे यांनी पांगोली नदी पुनर्जीवित करण्याची मागणी केली. सोबतच बिरसी विमानतळावरुन गोंदिया ते पुणे व मुंबई हवाई सेवा सुरु करावी व जिल्ह्यातील तांदूळ निर्यातीसाठी ड्रायपोर्टला मंजूरी देण्याची विनंती केली.      कार्यक्रमाचे प्रास्ताविक रस्ते परिवहन मंत्रालयाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव सिंग यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

निवडणुक आटोपली की विकासासाठी विरोध सोडून एकत्र यायला हवे-खा.प्रफुल पटेल

खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी रिंग रोड व ड्रायपोर्टची आवश्यकता आहे. ड्रायपोर्टसाठी राज्य सरकारकडून एमआयडीसीची जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले.गोंदिया शहराचा विस्तार हळूहळू होत असून नव्या गोंदियासाठी शहराच्या चारही बाजूला रिंगरोड देऊन वाहतुकीची कोंडी सोडवली जाऊ शकते.आपणासाठी गोंदिया काही नवे शहर नाही,आपणास ठाऊकच आहे गोंदियाच्या तीन्हीबाजुला रिंगरोड तयार होत असून तिरोड्याकडून बालाघाटकडे जाणारा नवा रिंगरोड कटंगी गावाच्या बाजूने जो वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून जाईल असा तयार करावे.सोबतच गोंदियाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रेल्वेलाईनला लागूनच जी 200 एकर जागा मोकळी आहे,त्या जागेवर येथील राईसउद्योगासह इतर उद्योगाला चालनादेण्यासाठी ड्रार्यपोर्ट तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावे राज्यसरकारकडून ती जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मी पुढाकार घेतो असे खा.प्रफुल पटेल म्हणाले.त्यापुर्वी निवडणुकीत आपण एकमेकांच्या विरोधात प्रचार करतो,काहीवेळा तर खूप काही बोलतो परंतु निवडणुका संपल्या की सर्वांनी ते विसरुन गाव ते शहर विकासासाठी एकत्र यायला हवे.आज माझी व गडकरींची गेल्या 30-35 वर्षापासूनची मैत्री आहे.जरी आम्ही वेगवेगळ्यापक्षात असलो तरी विकासाच्या मुद्यावर एकत्र आहोत.वास्तवीक मी गोंदियाच्या या कार्यक्रमाला येणार नव्हतो,परंतु गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला आणि गडकरीजी म्हणाले आपल्याला उद्या गोंदियाला जायचे आहे.तेव्हा मी म्हणाले राज्यसभेचा फार्म भरायचा आहे,उद्या त्याकरीता तयारी करायची आहे,तेव्हा राज्यसभेत तर तुम्ही जाणारच आहात त्यात काही अडचण नाही.परंतु आपण गोंदियाच्या कार्यक्रमाला जाऊ.त्यामुळे आज मी नागपूरला आलो त्यांच्या घरी गेलो आणि तिथून त्यांच्यासोबतच या कार्यक्रमाला हेलिकाँप्टरने आल्याचे आवर्जुन सागंत आपल्याला अनेकदात सहकार्य केल्याचे सांगितले.

पटेल गडकरींची एकत्रवारी चर्चेची ठरली

पटेलांना आपली मैत्री कशी आहे हे सांगतानाच आम्ही सोबत आलो गोंदियाच्या घरी नेऊन चहानास्ता केला आणि सोबतच या कार्यक्रमात आलो.आमच्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती भवनात तक्रार झाली,तेव्हा विमानाची सोय गोंदियात नव्हती त्यावेळी मी नागपूराल गडकरीकंडे गेलो आणि त्यांना सांगितले बघा असे आहे.राष्ट्रपती महोदयांनी दौरा रद्द केला,तेव्हा गडकरींनीच राष्ट्रपती महोद्यांशी स्वतःबोलून तुम्हाला उद्या गोंदियातील पटेलांच्या कार्यक्रमाला यायचेच आहे असे सांगितल्यानंतर कार्यक्रम पार पडला अशी आठवण करुन दिली.

Print Friendly, PDF & Email
Share