महाराष्ट्र: बिअरच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ

प्रहार टाईम्स न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बिअरच्या विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाली असून वाईन विकीदेखील हळूवार वाढत असल्याचे चित्र आहे, तर एकूण महसुलातदेखील 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राज्यात देशी दारूची 4 हजार 159, विदेशी दारूची 1 हजार 685, बिअरबी 4 हजार 947 आणि वाईनवी 31 दुकाने आहेत. साधारणपणे राज्यात दरवर्षी 33. 38 कोटी लिटर देशी दारूचा, 20 कोटी हिंदुस्थानी बनावटीचा परदेशी मद्य असा मिळून 85 कोटी लिटर असा खप आहे राज्याच्या तिजोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागा माध्यमातून महसूल जमा होतो. कोविडमुळे राज्यात दारूची दुकाने काही दिवस बंद होती दुकाने बंद असल्याने त्याचा परिणाम महसुलावर होत होता, कोविड काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरपोच म पोहचविण्यास सुरुवात केली होती.

त्यामुळे नागरिक घरी बसून वाईन व्हिस्कीची ऑर्डर करत होते. कोहि काळात यह बिअर प्यायल्यास सर्दी होईल सर्दी आल्यास कॉविड होईल अशी अनेकाना मनात भीती होती. भीतीपोटी अनेकांनी बिअर पिणे बंद केले होते. बिअरऐवजी लिस्की आणि वाईला अनेकानी प्राधान्य दिले होते. अरोडची राज्यात सुधारत गेल्यानंतर निबंधहवार हटविण्यात आले होते. त्यानंतर बार, परमिट रूममध्ये बिअर, व्हिस्की पिणारयांची संख्या वाढू लागली आहे. खासकरून मार्च ते जून या काळात राज्यात बिअरची विक्री अधिक असते. यात नागरिक व्हिस्की बिअर पिणे पसंत करतात. त्यामुळे या काळात बिअरचा खप वाढलेला असतो,
वर्ष खप लाख लिटर
2020-21 2011.93
2021-22 2312.81
गुन्हे नोंद करण्याचे प्रमाण वाढले
आयुक्त कांतीलाल उमाप यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दारू तस्करांविरोधात गुन्हे नोंद करून कारवाईचे प्रमाण वाढले आहे यदाच्या वर्षी अटक आरोपीचे प्रमाण 19 टक्क्यांनी वाढले आहे. ‘ऑपरेशन ऑलआऊट, चेकनाक्यावरील गस्त यामुळे परराज्यातून येणारया अवैध दारूचे प्रमाण कमी झाले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें