आमदार सहषराम कोरोटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीटचे पॅकेट वाटप

देवरी 03 : आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांचा वाढदिवस गुरुवार( ता.३ मार्च) रोजी दुपारी १२ वाजता देवरी येथील आमदार निवासात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस देवरी-आमगाव व सालेकसा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ता यांच्या प्रमुख उपस्थित वाढदिवसाचा केक कापून आमदार कोरोटे यांनी वाढदिवस साजरा केला.
या प्रसंगी गोंदिया काँग्रेस चे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे, गोंदिया जि.प.च्या माजी अध्यक्ष उषाताई मेंढे, जि.प.काँग्रेस चे गटनेते तथा देवरी तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, देवरी नगरपंचायत चे काँग्रेसचे गटनेते सरबजीत सिंग भाटिया, नगरसेविका सुनीता शाहू, नगरसेवक मोहन डोंगरे, नितीनकुमार मेश्राम, स्वीकृत नगरसेवक शकील कुरैशी यांच्या सह देवरी आमगाव व सालेकसा तालुक्यातील नवनिर्वाचित जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, तालुकाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित राहून आमदार कोरोटे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार केला.


तत्पूर्वी आमदार सहषराम कोरोटे यांच्या वाढदिवसानिमित्य देवरी तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भर्ती रुग्णांना फळ व बिस्कीट चे पॅकेट वाटप केले.
यावेळी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शकील कुरैशी, शहराध्यक्ष कुलदीप गुप्ता, जिल्हा महासचिव बळीराम कोटवार, नगरसेवक सरबजीत सिंग भाटिया, नितीनकुमार मेश्राम, प्रशांत कोटांगले, अविनाश टेंभरे, ओमप्रकाश रामटेके, अमित तरजूले, शार्दूल संगीडवार, अंतरिक्ष बहेकार, दीपक उर्फ राजा कोरोटे, राजेश गहाणे, संजय बडगे, सखी पेंटर, उज्वला कोचे, निर्मला मडावी, तारा टेंभूर्कर, छाया मडावी, मीनाताई राऊत, अनवंता आचले यांच्या सह काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित राहून रुग्णांना फळ व बिस्कीट चे पॅकेट वाटप केले. अशा प्रकारे आमदार कोरोटे यांचा वाढदिवस मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें