प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन

प्रख्यात कथ्थक नर्तक आणि पद्मविभुषण विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांते नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. गायक अदनान सामी यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली.

बिरजू महाराज यांचा जीवन परिचय

लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ लखनऊ येथे झाला. ते कथ्थक नृत्य कलाकार होते, त्याचबरोबर ते शास्त्रीय गायकदेखील होते. त्यांचे वडील अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेदेखील प्रसिद्ध कथ्थक नृत्य कलाकार होते.

बिरजू महाराज यांनी देवदास, डेढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटात डान्स कोरिओग्राम केले होते. शिवाय सत्यजीत राय यांच्या शतरंज के खिलाडी यामध्ये संगीतदेखील दिले होते. १९८३ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

काशी हिंदू विश्वविद्यालयातून बिरजू महाराज यांना डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले होते. २०१२ साली विश्वरुपम फिल्म डान्स कोरिओग्राफीसाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१६ मध्ये बाजीराव मस्तानी या चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ गाण्याची कोरिओग्राफीकरिता फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें