रितेश देशमुखची परिवारासह ताडोबा पर्यटनवारी
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतीय अभिनेता, विनोदी अभिनेता, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि चित्रपट निर्माता जो हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट सृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जाणारा रितेश देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया डिसूझा व मुलगा रियान आणि राहिल त्याच सोबत दोन मित्रासह जगप्रसिद्ध ताडोबा मध्ये व्याघ्र दर्शन करण्याकरिता दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी लिम्बन रिसोर्ट, मुधोली येथे त्यांचे आगमन झाले असून २८ डिसेंबर रोजी ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन सकाळी फेरी करिता गेले असता त्यांना वाघाचे दर्शन सोडून इतर प्राण्याचे दर्शन झाले.
दोन दिवसाच्या मुकामी असल्यामुळे बाकी असलेल्या सफारी मध्ये व्याघ्र दर्शन होण्याचे शक्यता आहे असे तेथील पर्यटक मार्गदर्शक यानी त्यांना म्हटले आहे.