ब्लॉसम शाळेच्या विद्यार्थ्यानी केली पथनाट्यतून मतदान जनजागृती

देवरी 17- नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 यांच्या सत प्रतिसत मतदान या कार्याक्रमांतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मुख्याधिकारी नगरपंचायत देवरी यांच्या मार्गदर्शनात ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथील विध्यर्थ्यांनी देवरी नगर पंचायत हद्दीतील विविध चौकाचौकात मतदान जन जागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले आणि मतदान करण्याचे संदेश दिले.

शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात मतदान जन जागृती पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर , बाल विकास अधिकारी संतोष वरपे , नगर पंचायतीचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर पथनाट्याच्या सादरीकरणासाठी शिक्षिका वैशाली मोहूर्ले , सरिता थोटे , राहुल मोहूर्ले तसेच विध्यार्थ्यांनी मोलाची भूमिका बजावली. देवरी नगर पंचायत हद्दीतील लोकांनी या पथनाट्य संचलनाचे कौतुक केले आणि मतदानाचे महत्व समजून घेतले.

Share