शब्द शंकरपाळी साहित्य समूहाच्या दिवाळी विशेषांक २०२१ चे प्रकाशन उत्साहात साजरे

शब्द शंकरपाळी साहित्य समूह दिवाळी विशेषांक काव्यसंग्रह २०२१ चे प्रकाशन मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक श्री.विजू माने यांच्या शुभहस्ते त्यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी करण्यात आले. कार्यक्रमास काव्यसंग्रहाचे संपादक भूषण सहदेव तांबे, सहसंपादिका आरती सशीतल, सहसंपादिका अवंतिका महाडिक, सल्लागार रोशन भोईर, ग्राफिक्सकार विघ्नेश पाष्टे,आणि अनघा विजू माने हे सर्वजण उपस्थित होते.

सर्वप्रथम सरस्वती देवीपूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सिने दिग्दर्शक श्री.विजू माने यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते शब्द शंकरपाळी दिवाळी विशेषांक २०२१ चे प्रकाशन करण्यात आले. श्री.विजू माने यांनी स्वपरिचय थोडक्यात सांगितला आणि दिवाळी विशेषांकाला शुभेच्छा दिल्या.

शब्द शंकरपाळी दिवाळी विशेषांक काव्यसंग्रहाचे संपादक श्री.भूषण सहदेव तांबे यांनी शब्द शंकरपाळी काव्यप्रकाराबद्दल आणि काव्यसंग्रहाबद्दल थोडक्यात माहिती दिली. शेवटी सहसंपादिका आरती सशीतल आणि अवंतिका महाडिक यांनी प्रमुख अतिथींचे आणि मान्यवरांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

Print Friendly, PDF & Email
Share