देवरी: पंचशील चौकात इसमावर कुऱ्हाडीने हल्ला, उपचारकरीत नेत असता वाटेतच मृत्यू

देवरीच्या पंचशील चौकात एका इसमावर कुऱ्हाडीने हल्ला ; अधीकच्या उपचारकरीत नेत असता वाटेतच मृत्यू

देवरी 09: गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील दि.०८:देवरी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या येथील पंचशील चौकात बुधवारी (ता.०८सप्टेंबर)मारबचे पाडव्याच्या सायकांळी सात वाजेच्या सुमारास ५० रुपयाच्या वादावरून एकाने कुऱ्हाडीने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या घटनेतील जखमीला गोंदियाला उपचारासाठी नेत असतांना वाटेतच दगावल्याची माहिती आहे.

या घटनेतील जखमीचे नाव बच्चनगिरी दौलतगिरी गुंडी (वय५७ वर्ष ) राहणार भागी तर आरोपीचे नाव कुणाल रामेश्वर कांबळे (वय१८वर्ष ) राहणार पंचशील चौक देवरी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास देवरीच्या पंचशील चौकात राहणाऱ्या रामेश्वर कांबळे याचेकडे फिर्यादी बच्चनगिरी गुंडी हा आपले उधार असलेले ५० रुपये परत मागण्यासाठी आला होता. या पैशावरून म्रुतक आणि आरोपीचा वडील रामेश्वर या दोघांत किरकोळ वादावादी झाली. याचा राग मनात धरून आरोपी कुणाल याने बच्चनगिरी याच्या मागून येऊन मानेवर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. फिर्यादीच्या म्रुतकच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपीस भादंविच्या कलम ३०७ आणि ५०४ खाली अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांचे मार्गदर्शाखाली देवरी पोलिस करीत आहेत.

Share