आरबीआय’चा नवा नियम : उद्यापासून एटीएम मधून पैसे काढणे व डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर महागणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : बँकिंग सेवा वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर यावरील शुल्कासंदर्भात आरबीआयकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ केली. आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे.
हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आरबीआयच्या मते, इंटरचेंज शुल्क ग्राहकाने क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास मर्चंट बँकेला लागू होतात. कार्ड इशू करणारी बँक इंटरचेंज फी पे करते. हे शुल्क बँका आणि एटीएम कंपन्यांमध्ये नेहमीच वादाचा विषय ठरले आहे. सध्या हे इंटरचेंज शुल्क वित्तिय व्यवहारांसाठी 15 रुपये तर गैरवित्तिय व्यवहारांसाठी 5 रुपये आहे.
आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे. हे दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
जेव्हा एखादा ग्राहक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करतो, तेव्हा हे पेमेंट प्रोसेस करणाऱ्या मर्चेंटच्या बँक खात्यातून ट्रान्झॅक्शन फी घेतली जाते. अशावेळी जर एखाद्या ग्राहकाने कोणत्याही दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर केला तर अशावेळी तुमची बँक त्या दुसऱ्या बँकेला शुल्क देते. या शुल्काला इंटरचेंज चार्ज म्हटले जाते.
रिझर्व्ह बँकेने जूनमध्ये असे म्हटले होते की 1 ऑगस्टपासून एटीएम इंटरचेंज फीस 15 रुपयांवरुन 17 रुपये करण्यात येणार आहे. एटीएम ट्रान्झॅक्शन शुल्कामध्ये 9 वर्षानंतर बदल झाले आहेत.