लाखनी शहरात अग्निशमन वाहनांची व्यवस्था हवी या करिता सार्वभौम युवा मंचाच्या वतीने नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन


प्रतिनिधी/अक्षय बी खोब्रागडे(8999008682)
लाखनी २८: लाखनी येथे रात्री सुमारे 4 ते 5 वाजता च्या सुमारास सिंधी लाईन, लाखनी येथील नागराज फुलवाले व अंबिका जनरल स्टोअर्स इथे भीषण आग लागून दोन्ही दुकाने जळाली.
अश्या प्रकारचे प्रकरण दरवर्षी घडत असतांना स्थानिक प्रशासन म्हणून नगरपंचायत ने अग्निशमन वाहन ची व्यवस्था करायला हवी, ह्यासाठी आज नगरपंचायत लाखनी चे मुख्याधिकारी राजेंद्रजी चिखलखुंदे ह्यांना सार्वभौम युवा मंच च्या वतीने निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी मुख्याधिकारी चिखलखुंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली व ह्याविषयी जिल्हाधिकारी साहेबांना प्रस्ताव दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
प्रस्तावाची प्रत सुद्धा प्राप्त झाली. व हा विषय लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
ह्यावेळी सार्वभौम युवा मंच चे पदाधिकारी, व्यापारी बांधव व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें